आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपावली स्नेहमिलन:सत्तेचे लोणी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आ. कैलास गोरंट्याल यांनी केले

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेचे लोणी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार कैलास गोरंट्याल यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आज या ठिकाणी कार्यकर्त्यांची असलेली लक्षणीय उपस्थिती हे त्यांच्या चांगल्या कामाचे द्योतक असल्याचे उद्गार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी काढले. जालना शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी गुरू गणेश भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी माजी आ. नामदेव पवार, आ. कैलास गोरंटयाल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, संतोष सांबरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल, आर. आर. खडके, अक्षय गोरंटयाल, एकबाल पाशा, नवाब डांगे, अंकुशराव राऊत, ब्रम्हानंद चव्हाण, राजेंद्र राख, गणेशलाल चौधरी, गणेश राऊत, सतिष पंच, विनायक महाराज फुलंब्रीकर, सुषमा पायगव्हाणे, शीतल तनपुरे, दीपक भुरेवाल, भंते शिवली, भास्कर मगरे, प्रभाकर पवार, बाळासाहेब तनपुरे, बाला परदेशी, सुरेश खंडाळे अण्णासाहेब खंदारे आदींची उपस्थिती होती. अंबेकर म्हणाले, आपल्या देशात प्रत्येक सण काही ना काही संदेश देण्याचे काम करतात.

दही हंडीचे उदाहरण देताना कार्यकर्त्यांच्या थरावर दहीहंडी फोडण्याचे काम आ. गोरंटयाल यांनी केले असले तरी सत्तेचे लोणी मात्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पणती ही घरात प्रकाश पाडण्याचे काम करत असते. कार्यकर्तारुपी पणतीला तेल देण्याचे काम आ. कैलास गोरंटयाल यांनी केल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जमली आहे. शहर व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गोरंट्याल परिवाराने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केल्यामुळे शहरासह जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात यश मिळवले असल्याचे अंबेकर म्हणाले.

आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून ताकतीने काम करायचे असून आघाडीशिवाय दुसरा कोणताही पक्ष दिसणार नाही अशी रणनिती आखायची असल्याचे अंबेकर यांनी सांगितले. आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, सत्तेचा दुरूपयोग करून महाराष्ट्र राज्यातून अनेक महत्वाचे प्रकल्प पळवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत असून बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे काम राज्यातील सरकारने चालवले आहे.

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षा म्हणून काम करत असतांना संगीता गोरंट्याल यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्या बरोबरच स्वच्छता आणि रस्ते निर्मितीला प्राधान्य देवून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाच वर्षापुर्वी शहराची असलेली परिस्थिती आणि आज असलेली परिस्थिती यात निश्चितपणे बदल झाल्याचे चित्र दिसत असून शहरातील नागरीक देखील विकास कामांमुळे समाधानी असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सुत्रसंचलन शेख महेमूद यांनी तर वसंत जाधव यांनी आभार मानले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे, फुलचंद भक्कड, बाबुराव सतकर, केदार कुलकर्णी, राम सावंत, त्रिंबकराव पाबळे, महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, जिवन सले, शेख शकील, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, वाजेद पठाण, संतोष माधवले, संजय भगत, विष्णू वाघमारे, आरेफ खान, फारूक तुंडीवाले, अशोक भगत, सय्यद अजहर, सुभाष देविदान, सुदेश सकलेचा, विनोद यादव, पारसनंद, श्रावण भुरेवाल, संगीता पाजगे, रमेश यज्ञेकर, चंदाताई भांगडीया, डॉ. विशाल धानुरे अादी उपस्थित होते.

मेडिकल काॅलेजसाठी ४०० कोटींचा निधी
कोविडकाळात अनेक जण घरात लपून बसले होते, परंतु आपण मात्र महामारीची परिस्थिती असतानाही गरजू लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घेऊन अडचणीच्या काळात अनेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. जालन्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कॉलेजच्या उभारणीसाठी लवकरच ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगून सत्ता कोणाचीही असली तरी जालन्यातील मेडिकल कॉलेज सुरू करणारच अशी ठाम ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...