आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 दिवस त्रास सहन करा:रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम सुरू, 15 दिवस राेज साडेतीन तासांचा ब्लॉक

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेसेवा सुरळीत राहणार
जालना स्थानकाला चार फलाट आहे. पुलाच्या कामामुळे यातील पहिल्या दोन रुळांना बंद करण्यात आले. या ठिकाणी सिमेंट ब्लॉक टाकल्यानंतर दुसऱ्या दोन रुळांना बंद केले जाईल.त्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरता लोखंडी १०० फुटी रूळ टाकून १५ दिवस रेल्वे पास होतील. याचा रेल्वे सेवेवर कोणाताही परिणाम होणार नाही.

रेल्वेची गती २० किमी
भूमिगत पुलाच्या कामासाठी येथील कार्यान्वित रूळ डेड करण्यात आल्यानंतर जालना स्थानक गेट ७८ ते गेट क्रमांक ७७ या दरम्यान प्रति तास २० किमीच्या गतीने रेल्वे धावणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ही गती ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

तीन किमीचा अतिरिक्त फेरा
रेल्वे गेट क्रमांक ७८ वरून रहदारी करणाऱ्यांना आता गेट ७८ वरून किंवा उड्डाणपुलावरून शहरात प्रवेश करावा लागणार आहे. जवळपास तीन किमी अंतर पार करून जालना रेल्वेस्थानकासमोरून जाता येणार आहे. ही स्थिती पुढील २० दिवस कायम राहणार आहे.

सहा तासांपासून सुटका
जालना रेल्वेस्थानकावरून दिवसाला ६० रेल्वे जातात. यामुळे सरासरी पाच ते दहा मिनिटांसाठी वेळेनुसार रेल्वेचे गेट ७८ बंद होते. परिणामी येथील वाहनधारकांना थांबावे लागते. एकूण २४ तासांत ६ तास गेट बंद राहते. आता २० दिवसानंतर त्या सहा तासांपासून वाटसरूंच्या वेळेत बचत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...