आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गक्रमण:संतांचे काम चांगला मार्ग दाखवण्याचे, त्यावरच समाजाने मार्गक्रमण करावे

तळणी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताचे काम हे मार्ग दाखवण्याचे असते व त्या मार्गावर चालण्याचे काम समाजाचे आहे. भगवतांची कथा समाजाला एेकवण्याचे काम साधूचे असून जोपर्यंत मनुष्याचे विचार हे सात्त्विक, धार्मिक होणार नाहीत तोपर्यंत त्या मनुष्याची प्रगती होणार नसल्याचे पाल मठाचे मठाधिपती गोपाल चैतन्य महाराज यानी लिबंखेडा येथे केले. जामनेर येथे २५ ते ३० जानेवारी पर्यन्त होणाऱ्या अखिल भारतीय हिन्दू बंजारा समाजाचे कुंभांचे आयोजन करण्यात आले असुन त्याचे निमंञण देण्यासाठी गोपाल चैतन्य महाराज लिबंखेडा येथे आले होते त्या निमित्य एक दिवसीय सत्संगात ते बोलत होते.

सनातन धर्म हा दिशा देणारा आहे जो कोणता समाज सनातन धर्माच्या प्रवाहासोबत आहे त्याची कधीच अधोगती होणार नाही. बंजारा समाज सुध्दा सनातन धर्माचा एक अविभाज्य भाग असून त्या सनातन धर्माच्या प्रवाहासोबत शेवटपर्यंत चालने हे बंजारा समाजाच्या हिताचे आहे. आपल्या सर्वाचे आदर्श हे राम आणि कृष्ण आहे.

शिवाची आराधना करणे हे आपले नित्याचे आहे. आजपर्यत आपल्याल्या आपल्या पूर्वजानी व संतांनी हाच मार्ग दाखवला. त्याच मार्गावर आपले गुरु लक्ष्मण चैतन्य बापूजी यानी मार्गक्रमण केले आहे. बापूजीनी राम आणि कृष्णाची भक्ती आपल्याला शिकवली. आपले आराध्य हे सेवालाल महाराज आहेत. जगंदबा देवी आहे. त्यांची भक्ती करा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सनातन धर्माचे घटक म्हणूनच या प्रवाहात वाहत जायचे आहे समाजाची वाताहत होऊ नये म्हणून कुंभ करण्याची गरज पडली आहे. मनुष्याला भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही खरी भक्ती ही सनातन धर्मातच शिकवली जाते. सनातन धर्म कधीच दुसऱ्याचा तिरस्कार, द्वेष करत नाही. भगवंताशिवाय जिवाचा उध्दार नाही.

भजनाचा मार्ग हा मनुष्य जातीच्या उध्दाराचा मार्ग आहे. तो प्रत्येकाने स्वीकाऱला पाहिजे. असे सांगून चैतन्य महाराजांनी बंजारा समाजातही अनेक महापुरूष जन्माला येऊन गेले आहेत त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणे गरजेचे असल्याचेही गोपाल चैतन्य महाराज यांनी सांगितले. प्रारंभी ग्रामस्थानी गोपाल महाराजांची टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. महिलांनी त्यांना ठिकठिकाणी औक्षण केले. यावेळी अर्जुन महाराज बादाड, सरपंच, उपसरपंच यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...