आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने संपवली जीवनयात्रा:प्रेयसी म्हणाली, तू मरून जा... फेसबुक लाइव्ह करत तरुणाने केली आत्महत्या

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना जिल्ह्यातील तरुणाने मुंबईत गळफास घेत संपवली जीवनयात्रा

“माझी प्रेयसी पहिल्यासारखा प्रतिसाद देत नाही. विचारणा केली तर तुझा-माझा संबंध नाही, तू मरून जा..’ असे प्रेयसीने म्हटल्यानंतर तरुणाने फेसबुक लाइव्ह करून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मुंबईतील कल्याण येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली. अंकुश नामदेव पवार (२७, पिंपळगाव रेणुकाई, ता. भोकरदन) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही हातभार लावावा म्हणून अंकुशने चार वर्षांपूर्वी मुंबई गाठले. त्या ठिकाणी त्याला कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात चांगल्या पगारावर काम मिळाले. पंरतु, येथे घटस्फोट झालेल्या एका तरुणीसोबत त्याची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मागील तीन वर्षांपासून अंकुश आणि त्या तरुणीचे प्रेम होते. यामध्ये त्यांनी लग्नाच्यादेखील आणाभाका घेतल्या होत्या. वर्षभरापासून अंकुश आपल्या प्रेयसीकडे पैसे जमा करत होता.

पंरतु, ती पैसे पार्टीवर खर्च करीत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. तेव्हा त्याने प्रेयसीला याबाबत विचारणा केली असता तिने उद्धट उत्तर दिले. अंकुशने तिला मरण्याची धमकी दिली होती. तिनेदेखील “मरून जा, मला तुझी गरज नाही,’ असे सांगताच अंकुशने अंगावरील कपडे काढून अर्धनग्न होऊन फेसबुक लाइव्ह करत मला प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे मी गळफास घेत असल्याचे सांगत आपली जीवनयात्रा संपवली.

बातम्या आणखी आहेत...