आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:तरुणांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बलवान व्हावे; ज्ञानेश्वर माउली महाराज शेलुदकर यांचे कोसगाव येथे केले निरूपण

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. जोपर्यंत या धरतीवर चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत शिवरायांचे नाव आहे. कारण त्यांनी आपल्या जिवावर उदार होत स्वराज्याची स्थापना करून अतिशय पारदर्शकपणे प्रशासन चालविले आहे. मात्र आजची तरुण पिढी ही व्यसनात गुरफटल्या गेली आहे. त्यामुळे समाजाची गती व प्रगती थांबली आहे. यासाठी समाजातील प्रत्येक तरुणाने व्यसनयुक्त होऊन बरबाद होण्यापेक्षा बलवान व हुशार होणे ही काळाची गरज असुन यासाठी प्रत्येक तरुणाने शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवचरिञांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे निरुपण ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित कीर्तनमालेत ते बोलत होते. शिवरायांच्या काळात आई-बहिणी सुरक्षित होत्या. त्यांच्या अब्रुवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर भर चौकात त्या आरोपीचा चौरंगा केला जात होता. माञ आज प्रत्येक दिवशी भर दिवसा आई-बहिणीची अब्रु लुटल्या जात असल्याच्या घटना विविध वर्तमानपत्रात आपणास वाचण्यास मिळतात. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. यासाठी आज देशात पुन्हा एकदा छञपती शासन आणण्याची भावना ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी यांनी बोलावून दाखवली. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

त्यामुळे तरुणांची भविष्य पिढी वाया चालली आहे. आज तरुणांनी जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या अंगातील मरगळ झटकून शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन कार्य करण्याची गरज आहे. कारण आज तरुण हा देशाचा कणा आहे. यासाठी तरुणांनी खंबीरपणे लढणे गरजेचे आहे. तरुणांनी बापाचे दोन-चार एकर वावर विकून नोकरीला लागण्यापेक्षा व्यवसायात उतरुन चार-पाच एकर वावर घेण्याची हिंमत ठेवावी जेणे करुन जन्मदात्याला देखील याचा अभिमान वाटेल. आज देशात शिवरायांच्या नावाखाली राजकारण केल्या जात आहे. माञ शिवरायांनी कधीही जातीयतेला थारा लागु दिला नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली.

परंतु आज राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण केली जात आहे. धर्मा-धर्मात जातीय दंगली घडवुन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही खुप मोठी शोकांतीका असून आपण शिवरायांच्या मातृभुमीत जन्म घेतला आहे. यासाठी शिवरायांचे विचार अंमलात आणून जीवन जगले पाहीजे असा सल्ला महाराजांनी दिला. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...