आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना सेलू-परभणी रस्त्यावर असलेल्या गट्टूच्या काररखान्याजवळ घडली. अशोक मुरलीधर गिराम (३५, निपाणी टाकळी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अशोक गिराम यांच्या डोक्याला जबर मार लागलेला असल्यामुळे मेंदू बाहेर पडून जागीच ठार झाले. अशोक गिराम घरून जेवण करून फिरण्यासाठी सेलू परभणी रस्त्यावर आले असता हा अपघात झाला. प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...