आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ:जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही महिन्यांपासून चोऱ्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी तीन ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तालुका, हसनाबाद, बदनापूर या ठाण्यांच्या हद्दीत या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. जालना तालुक्यातील राममूर्ती येथे चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम, दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर पंढरपूरवाडी शिवारातील एका शेतातून डिझेल इंजिन, विद्युत पंप चोरून नेला आहे.

तर बदनापूर तालुक्यातील भातखेडा शिवारात असलेल्या विहिरीतून चोरट्यांनी सौरपंप चोरून नेला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...