आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:वडीगोद्रीत चोरी, दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

वडीगोद्री4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करुन १ लाख ७० हजार रुपये व दागिने पळविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. आजारपणाच्या उपचारासाठी घरात ठेवलेल्या १ लाख ७० हजाराच्या रोख रक्कम ठेवली होती.

वडीगोद्री येथील अंगणवाडी सेविका शिवकन्या शहादेव गिरी या आपल्या विवाहित मुलगी आजारी असल्याने तिला मुंबईला भेटण्यासाठी गेल्या होत्या‌. हीच संधी साधत दरोडेखोरांनी आत घुसून कपाटातील असलेली एक लाख ७० हजार रुपये रोख रक्कम एक सोन्याचा ओम व कानातले असा दोन लाख रुपयाचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. तसेच चोरट्यांनी त्याच गल्लीतील बंद असलेल्या कचरु शिकारे यांच्या ही घराचे कुलूप तोडले व आजूबाजूच्या घराच्या कड्या लावून घेतल्या होत्या असे नागरिकांनी सांगितले.

दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोड वरून दरोडेखोर गावात जातांना सीसीटीव्हीत सहा तरुण हातात काठ्या,तलवारी घेवून जाताना कैद झाले आहेत. यातील दोघांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता.

बातम्या आणखी आहेत...