आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर प्रकार समोर:जप्त केलेल्या ट्रकमधील गुटख्याची ठाण्यातून चोरी ; स्थानिक गुन्हे शाखेने केली होती कारवाई

जालना / लहू गाढे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यात जप्त केलेल्या वाहनांचे सुटे पार्ट चोरीस जाण्याचे प्रकार अनेकदा घडतात. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याचे दोन ट्रक पकडून ते चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. ठाण्याच्या मोकळ्या मैदानात ट्रक उभे केले आहे. परंतु या ट्रकमधून गुटखा चोरीस जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ट्रकमध्ये गुटखा ताडपत्रीने पॅक बंद करून ठेवलेला आहे. परंतु, रात्रीच्या वेळी ताडपत्री कापून चोरटे यातील गुटखा चोरून नेत आहेत. जप्त मुद्देमालाची चंदनझिरा ठाण्यातूनच चोरी होत असल्याने पोलिस यंत्रणा काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने कर्नाटक येथे जाणाऱ्या गुटख्याचे दोन ट्रक नवीन मोंढ्याच्या चौफुलीवर पकडे होते. ही कारवाई ७ एप्रिल रोजी केली होती. या ट्रकमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा होता. पथकाने कारवाई करून हे ट्रक चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतरचा पुढील तपास चंदनझिरा पोलिसांनी केला आहे. तपास‌ सुरू असल्यामुळे गुटखा त्याच वाहनात ठेवून ताडपत्रीच्या खाली गुटखा असलेले हे ट्रक पोलिस ठाण्याच्या परिसरात उभे केलेले आहे. परंतु या ट्रकमधून चोरटे रात्रीच्या वेळी गुटखा पार्सल करीत आहेत. लाखो रुपयांचा गुटखा चोरट्यांनी चोरून नेला आहे.

अशी होतेय गुटख्याची चोरी ठाण्याच्या डाव्या हाताने गुटख्याचे दोन ट्रक उभे केलेले आहे. या ट्रकच्या बाजूला अजून वाहने आहेत. वाहनांजवळ गवत असल्यामुळे ठाण्यातील पोलिसांचे याकडे लक्ष जात नाही. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असतो. यामुळे चोरटे रात्रीच्या वेळी अंधारात वाहनाच्या समोरून ट्रकवर चढून फाडलेल्या ताडपत्रीतून गुटखा बाहेर काढून पसार होत आहेत. तसेच या परिसरात गुटख्याच्या पुड्या पडलेल्या आहेत.

प्रकाराबाबत माहिती घेतो मी येण्याअगोदरची ही कारवाई आहे. या प्रकाराबाबत माहिती घेतो. जप्त वाहनातून गुटखा जातो, याबाबत अधिकची माहिती घेतल्यानंतर बोलतो. - डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...