आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस देणार व्यायामाचे धडे:शहरात होतेय महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक अन‌् जिम

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून जालना शहरातील मधुबन कॉलनी व संभाजीनगर भागात महिला, मुलींसह पुरुषांसाठी जिम होत आहे. मोकळ्या जागेत व्यायामाचे साहित्य लावण्यात येत आहे. या ठिकाणी वॉल कंपाउंड करून यात महिला, मुलींना दररोज व्यायाम करण्याची सुविधा होणार आहे. जालना शहरात पहिल्यांदाच जिम होणार असल्यामुळे जालनेकरांतून याचे स्वागत होत आहे. मधुबन कॉलनीत केवळ महिला, मुलींसाठी जिम असणार आहे. येथे येणाऱ्या महिला, मुलींना पोलिस प्रशासनातील एक महिला व्यायामाचे धडे देणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या सहकार्याने जालना शहरातील मधुबन कॉलनीत महिला, मुलींसाठी पहिल्यांदाच जिम होत आहे. माजी नगरसेविका संध्या संजय देठे यांनी यासाठी पाठपुरावा केला. या भागात सध्या या व्यायामशाळेचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही प्रमाणात साहित्यही लावण्यात आले आहे. तसेच जालना शहरातील इतर काही भागांमध्येही याबाबतचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर जालना शहरातही विकास होण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला आहे.

पालिका प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिला महिला, मुलींसाठी स्वतंत्र जिमचे काम दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पालिकेच्या बैठकीत वारंवार मुद्दा उपस्थित करून पालिका प्रशासनाने यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. - संध्या संजय देठे, माजी नगरसेविका

स्तुत्य उपक्रम राबवला नगरसेविका संध्या देठे यांच्या माध्यमातून मधुबन कॉलनीत पहिल्यांदाच महिला, मुलींसाठी असा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात असा उपक्रम व्हावा. - अॅड. शैलेश देशमुख, जालना.

बातम्या आणखी आहेत...