आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण जाहीर:इच्छुकांमध्ये कहीं खुशी कहीं गमचे वातावरण ; मातब्बरांना नवीन मतदार संघ शोधावे लागणार

रामनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे गुरुवारी आरक्षण जाहीर झाले असून आरक्षण सोडतीमध्ये कही खुशी कही गम चे वातावरण दिसत आहे. आरक्षणामुळे काही मातब्बरांचे गट व गण राखीव झाल्याने त्यांना नवीन मतदार संघ शोधावा लागणार आहे. जालना तालुक्यात १० जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची संख्या २० आहे. गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये वाघरुळ जहांगीर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, पिरकल्याण ओबीसी, मौजपूरी अनुसूचित जाती, सेवली सर्वसाधारण महिला, नेर सर्वसाधारण महिला, हिवरा रोषणगाव ओबीसी महिला, भाटेपुरी ओबीसी महिला, देवमुर्ती सर्वसाधारण महिला, इंदेवाडी सर्वसाधारण महिला, रेवगाव सर्वसाधारण साठी आहे. तसेच पंचायत समिती गणात वाघ्रूळ जहागीर सर्वसाधारण पुरुष, गोंदेगाव सर्वसाधारण महिला, कडवंची ओबीसी महिला, पिरकल्याण सर्वसाधारण, मौजपुरी सर्वसाधारण, मानेगाव खालसा एस सी महिला, पाथरूड एससी महिला, शेवली सर्वसाधारण महिला, नेर सर्वसाधारण पुरुष, चितळी पुतळी सर्वसाधारण महिला, विरेगाव सर्वसाधारण पुरुष, हिवरा रो. एससी पुरुष, रामनगर सर्वसाधारण पुरुष, भाटेपुरी सर्वसाधारण महिला, देवमुर्ती - सर्वसाधारण, सिंधी काळेगाव सर्वसाधारण महिला, रेवगाव ओबीसी महिला, कारला ओबीसी पुरुष, इंदेवाडी ओबीसी, गोलापांगरी सर्वसाधारण पुरुष साठी सुटलेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार तयारी करीत आहे मात्र आरक्षण सोडतीमध्ये अनेकांचा मुड गेला.

बातम्या आणखी आहेत...