आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन उद्योजक भाईश्री रमेशभाई पटेल यांनी केले. पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे विक्रम टी. प्रोसेसर प्रा. लि. जालना यांच्या माध्यमातून सीएसआर फंडांतर्गत शेततळ्याची निर्मिती करण्यात आली असून रमेशभाई पटेल आणि ताराबेन पटेल यांच्या हस्ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे ७५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे निर्माण करण्यात आले. तसेच पीटीएस परिसरातील वृक्षांचे संवर्धन आणि प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या वापरासाठी विधिवत पूजा करत समर्पित करण्यात आले. सामाजिक भावनेतून आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे हे एक मोठे योगदान विक्रम टी. प्रोसेसर प्रा.लि. यांनी दिले आहे.
भाईश्री परिवार नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रेसर आहे. घाणेवाडी जलाशय गाळमुक्त करण्यासह सतत वेगवेगळ्या सामाजिक कामात सक्रिय असतात. जलसंवर्धनाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा समर्पित भावनेने पुढाकार आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस प्रशिक्षण केंद्र परिसरामध्ये मोठी आग लागली होती आणि त्यामध्ये बऱ्याच वृक्षांसह, पशूपक्ष्यांना इजा पोहोचली अशी माहिती भाईश्री यांना मिळताच त्यांनी तत्काळ पीटीएसचे प्राचार्य अभय डोंगरे यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. त्याच अनुषंगाने पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अतिरिक्त वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका मोठ्या शेततळ्याची निर्मिती विक्रम टी. प्रोसेसर प्रा.लि.च्या माध्यमातून करून दिली, या शेततळ्यातील पाण्याचा उपयोग परिसरातील हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी आणि निकडीच्या वेळी प्रशिक्षणार्थी पोलिस यांच्यासाठी होणार आहे. भविष्यातही पोलिस प्रशिक्षण केंद्र संपूर्ण परिसर वृक्षवेलींनी समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन भावेशभाई पटेल यांनी दिले. यावेळी उद्योजक सुनिल रायठठ्ठा, अरूण अग्रवाल, रितेश मंत्री, ओमप्रकाश चितळकर, भारत मंत्री, उदय शिंदे, प्रितम लोणगावकर, किशोर खैरे, उपप्राचार्या प्रवीणा यादव, प्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.