आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही; माजी मंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

बदनापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आपली उन्नती करायची असेल तर आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे, असे आवाहन करुन माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

बदनापूर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि मातंग समाज प्रबोधन मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार राजीव आवळे, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, परमेश्वर नाईकवाडे आदींची उपस्थिती होती. राजीव आवळे यांनी आपण छोटे- मोठे उद्योग केले पाहिजे. व्यसनापासून दुर राहण्याचा संदेश दिला. प्रास्ताविक संदीप पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश घोरपडे यांनी केले,तर सुरेश आसुर्ड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारभारी जाधव, सुरेश आर्सुड, कैलास मदन, कैलास पाटोळे, आकाश पाटोळे, अंकुश आर्सुड आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...