आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेकुराचे हित साधन एकच आई धन्यता मानत असते यामुळे ईश्वरालाही आईच्या प्रेमाचा लोभ होतो आईसारखे दुसरे दैवत जगात नाही असे प्रतिपादन ज्ञानेश्वर माउली शेलुदकर यांनी केले जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प गुंफताना ते बोलत होते.
लेकुराचे हित जाणे माउलीचे चित्त या अभंगाचे निरुपण करताना ज्ञानेश्वर माऊली यांनी आईचे महत्त्व विशद केले मातृदिनाच्या निमित्ताने आईवर प्रेम भावना व्यक्त करणाऱ्या लेकरांनी आई-वडिलांना विसरू नये त्यासोबतच आईवर माया करावी तर आई-वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागणार नाही आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आईचे प्रेम निस्वार्थ पणाने आपल्या बालकाला मिळत असते लेकराच्या हितच मातेचे एस दडलेले असत यामुळे प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करावी असेही ज्ञानेश्वर माऊली यांनी स्पष्ट केले.
आजचा तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनाला व्याधी निर्माण करून घेत आहे यामुळे तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता भक्तिमार्ग धरावा भक्ती मार्गामध्ये सत्कर्म सतयुग करण्याची प्रेरणा मिळत असल्याने या मार्गात सर्वत्र सुखच सुख असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले अल्प समाधानासाठी व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे यामुळे आजकालच्या तरुणांनी दारू सिगारेट गुटका यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी किर्तनाला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होती हरिभक्त परायण सोनवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले या सोहळ्यात विविध कीर्तनकारांची दररोज कीर्तन होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.