आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी मिळेना:भोकरदनच्या बँकांत पाणी मिळेना

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बँकांमध्ये सुविधांचा अभाव दिसून येत आहे. परिणामी शौचालयासह पिण्याच्या पाण्याचा अभाव असून महिलांची कुचंबना तर दिव्यांगांची हेळसांड होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून बँकांमध्ये शौचालय व पिणाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.भोकरदन तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध राष्ट्रीयकृत तथा जिल्हा बँकेच्या सर्वच शाखा आहेत. ग्राहकांमुळे या शाखा गजबजलेल्या असतात.

यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व महिलांचा समावेश आहे. बँकांमध्ये शौचालय आहेत. परंतु ते ग्राहकांसाठी नसून फक्त कर्मचाऱ्यांसाठी असल्याने त्यांना नेहमी कुलूप लावलेले असते. त्याचा उपयोग केवळ कर्मचारी करत असल्याने बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मात्र कुचबंना होत आहे. पिण्याच्या पाण्याची तीच बोंब आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. या प्रकरणी सर्वच राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांनी आपल्या परीने ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे. दरम्यान, भोकरदन शहरातील बँकांमध्ये कामानिमित्त आल्यानंतर तिथे ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित बँकांनी याकडे लक्ष देऊन बँकेमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब जाधव, बँकेेेचे दिव्यांग ग्राहक चौरंगीनाथ लोखंडे यांनी सांगीतले.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे माजी नगरसेवक अब्दुल कदीरबापु यांनी संागितले.

बातम्या आणखी आहेत...