आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शाळांमधून माणूस घडविणाऱ्या मूल्य संस्काराचा ध्यास असावा; प्रा. डॉ. दिगंबर दाते यांचे प्रतिपादन

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलते सामाजिक जीवन, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव विचारात घेता शालेय मुलांची मानसिकता बदलत आहे. शाळांमधून आता माणूस घडविणाऱ्या मूल्यसंस्कार विचारांचा ध्यास शिक्षकांनी घेतला पाहिजे तरच परिवर्तन होईल, असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दाते यांनी केले.

बदनापूर तालुक्यातील काजळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष राधाकिसन बळप होते. या वेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, संतोष लिंगायत, आसाराम गरड, राहुल तुपे, कैलास खंडेकर, लक्ष्मण बळप, अर्जुन जाधव, विलास खंडेकर, धनंजय गरड, मुख्याध्यापक आर. आर. जोशी यांची उपस्थिती होती.

डॉ.दाते म्हणाले, ग्रामीण भागात गुणवंत विद्यार्थी असतात परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. बदलत्या काळानुसार माणूसपण घडविणारे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनीच भूमिका बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. सुहास सदाव्रते म्हणाले, आज सर्व क्षेत्रात जी अस्थिरता उदासिनता दिसून येते याला कारण वाचनक्षमता हरवत चालली आहे. साने गुरुजींच्या ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ या मूल्यसंस्कार विचारांची समाजाला अपरिहार्यता असल्याचे डॉ.सदाव्रते यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर.आर.जोशी यांनी शालेय परिसर, भौतिक सुविधेसह शाळेच्या प्रगतीत लोकसहभाग महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. गावकरी,पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून शाळेचा चेहरामोहरा बदलू शकतो, असे सांगितले. सुत्रसंचालन दीपक क्षीरसागर यांनी केले.

कार्यक्रमास रमेश गोल्डे, जगन्नाथ नागरे, हर्षवर्धन चिकटे, अल्लाउद्दीन शेख, सुनिता सानप, ललिता बाबर, छाया कुटे, कोमल वाघमोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...