आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भवताल समजून घेताना करुणा, संवेदनशीलपणा असावा ; कवी डाॅ. दासू वैद्य यांचे प्रतिपादन

परतूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भवताल समजून घेताना आपल्यातील करुणा आणि संवेदनशीलपणा असेल तर जग सुंदर दिसेल, अशी दृष्टी अन सृष्टी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी ध्यास घेतला पाहिजे,असे प्रतिपादन कवी डाॅ. दासू वैद्य यांनी केले. परतूर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला जालनातर्फे स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विचार मंचचे अध्यक्ष डॉ. एस. जी. बाहेकर होते. यावेळी विनोद शिरसाठ, नाटककार राजकुमार तांगडे, अभिनेते संभाजी तांगडे, विनोद जैतमहाल, शालेय समिती अध्यक्ष संदीप बाहेकर, डाॅ. सुधाकर जाधव, कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते, प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, डॉ.यशवंत सोनुने, डाॅ.भगवान दिरंगे, मुख्याध्यापिका संगीता शिंदे, बाबासाहेब हेलसकर, रामदास कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना कवी दासू वैद्य म्हणाले, आपल्या अवती भवती अनेक नकारात्मक घटना घडतात,परंतु आपली दृष्टी ही सकारात्मक असली पाहिजे.

आजच्या काळात शिक्षकाने भगवान गौतम बुध्द यांचा करुणेचा विचार आत्मसात करण्याची आवश्यकता विशद केली. साने गुरुजींचा मूल्यसंस्कार विचार कसा बाळगावा, याचे संदर्भ देत बॉम्ब व्हावेत रंगीत फुगे आणि बंदूकीच्या नळकांड्यात पाखरांनी खोपे करावे’ असा नवा शांततेचा विचार मांडला. विद्यार्थ्याच्या जीवनात शालेय वातावरण, शिक्षक किती महत्वाचे ठरतात याचे अनेक दाखले देत विद्यार्थ्याना आपल्या भाषणातून डाॅ.वैद्य यांनी मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. आर. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुनील खरात यांनी तर अविनाश लोमटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दत्तात्रय राऊतवाड, प्रमोद देशमुख, श्रावणी हेलसकर आदींनी परिश्रम केले. दरम्यान, कार्यक्रमात लेखक, पत्रकार, गीतकार विनोद जैतमहाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकवींचे कविसंमेलन रंगले. कविसंमेलनात श्रावणी बुरकुले, नेहा उबाळे,अनुश्री तोटकर, वेदांत लोमटे, शांभवी देशमुख, दिव्या जाधव, सार्थक पाठक, रोहिणी शेरे,वैष्णवी मुसळे,संपत शेरे, आदित्य पोखरकर यांच्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डाॅ.सुहास सदाव्रते यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...