आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या:तीन ठिकाणी चोऱ्या; एक चाेरटा सीसीटीव्हीत कैद

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील विविध भागांमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी शहरातील निधी अर्बन बॅँकेतही चोरी केली आहे. चोरट्यांनी संजोगनगर येथील ग्रामसेवकाच्या घरातील मुद्देमाल चाेरून नेला. अॅग्रोव्हील फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्यालय चोरट्यांनी फाेडले. या तीन एक चाेरटा सीसीटीव्हीत कैद झाला.

जालना शहरातील अंबड रोडवर कलावती निधी अर्बन बँक आहे. या बँकेचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून बँकेतील ३० हजार ५६० रुपये चोरून नेले आहे. गोपीनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दुसऱ्या घटनेत संजोगनगर येथील ग्रामसेवक हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दुसऱ्या घटनेत शहरातील अंबड चौफुली परिसरातील जांगडे कॉम्प्लेक्समधील अॅग्रोव्हील फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्यालय चोरट्यांनी शनिवारी फोडले. संचालक गणेश सुळसुळे हे कामानिमित्त शहरात गेले असता दुचाकीहून आलेल्या चोरट्याने हे कार्यालय उघडून चोरी केली आहे.या घटनेत एक चाेरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...