आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:ट्रॅकसूट, मास्क घालून चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट कार्यालय फोडले, 43 हजार केले लंपास

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाने ट्रॅकसूट, तोंडाला मास्क बांधत चेहरा झाकून तर दुसऱ्या चोरट्याने पहारा देत विशाल एन्टरप्रायझेस ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडल्याची घटना सरोजिनीदेवी रोडवरील एकता कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी मध्यरात्री घडली आहे. चोरट्यांनी ४३ हजार रुपयावर डल्ला मारला आहे.

सोमवारी रात्री चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या शटरचा कडी-कोयंडा कटरने कापून आत प्रवेश केला. कार्यालयात ठेवलेले रोख ४३ हजार चोरून नेले आहेत. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ट्रॅकसूट व मास्कमुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही. तरीसुद्धा गोपनीय सूत्रे हलवून लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. यापूर्वी नूतन वसाहत भागातील एक एटीएमही चोरून नेल्याची घटना जालना शहरात वर्षभरापूर्वी घडली होती. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरटे तोंडाला काळा रुमाल बांधून येतात. चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर पळवल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...