आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची तिसरी लाट:मार्च महिन्याच्या मध्यात संपणार कोरोनाची तिसरी लाट : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे निर्बंध कमी करण्याकडे शासनाला कल असेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्हा रुग्णालय परिसरात पाच मोबाइल क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. राज्यात कोव्हॅक्सिनचा काही प्रमाणात तुटवडा आहे. राज्यात काही कोरोना रुग्णांमध्ये ब्रेन स्टोकचा आजार आढळून येत असल्याचे समोर आले आहे. मात्र, याबाबत निष्कर्षाअंतीच बोलता येईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील ९२% लोकांनी पहिला तर ५५ ते ६०% लाेकांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ वर्षांच्या पुढील मुलांचे आयसीएमआर सांगेल तेव्हा लसीकरण सुरू केले जाईल. जगात लहान मुलांपासून सर्वांचेच लसीकरण करण्यात येते आहे, यासंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...