आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर आला. जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९३.९८ टक्के लागला. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. जाफराबाद तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६१ टक्के लागला आहे.
कोरोनातील उघडझाप करणारे लॉकडाऊन आणि शैक्षणिक आयुष्यातील टर्निंग पॉइंट असलेल्या इयत्ता बारावीतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची असलेली ऑनलाइन तसेच ऑफलाइनची धडपड यामुळे पालकांत मोठी द्विधा मन:स्थिती झाली हेाती. शिवाय याला परीक्षेच्या काही अंशी कोलमडलेल्या नियोजनाने खोडा घातला.
मात्र, अशा अनंत अडणींवर मात करून पार पडलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यातून निकालातून गुणवत्ता घसरेल असा अंदाज होता. मात्र, तसे न होता विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचे जाहीर झाले आहे. या वर्षी इयत्ता बारावीसाठी ३१ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
@९७.४८ सर्वाधिक विद्यार्थी विज्ञात शाखेत
विज्ञान शाखेत एकूण १६ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ९७.४८ टक्के निकाल लागला. कला शाखेत १२६२७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९०.१२ निकालाची टक्केवारी आली. याबराेबरच वाणिज्य शाखेत २३०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्होकेशनलचा निकाल ९२.६१ तर टेक्निकल सायन्सचा ८७.५० टक्के निकाल लागला आहे.
९४.९३ टक्क्यांवर विद्यार्थिनी झाल्या उत्तीर्ण
राज्य बोर्डाची परीक्षा यंदा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १७ हजार ८५३ विद्यार्थी तर ११ हजार ७२१ विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी ९४.९३ विद्यार्थिनी पास झाल्या तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९३.३७ टक्के आहे. अभ्यासात चिकाटी अन् मेहनत करून तुलनेने यशाचा पल्ला गाठण्यात मुलींचे प्रमाण अधिकच राहिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.