आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष २०२३ मधील सर्व शाळांसाठी उन्हाळी सुट्यांबाबत व शैक्षणिक सत्र २०२३-२४ बाबत शासन निर्णय व संचालकांनी पत्र काढले आहे. यावर्षी २ मे रोजीपासून सुट्या लागणार असून, १२ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. यावर्षी तब्बल ४० दिवस सुट्या देण्यात आल्या आहेत. यासाठी शासन परिपत्रक ११ एप्रिल २०२२ चा संदर्भ घेण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राथमिक शाळांचा देखील उल्लेख आहे. २ मे पासून उन्हाळी सुटी लागू करून सदर सुटीचा कालावधी विदर्भ वगळून ११ जून २०२३ पर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ मध्ये दुसरा सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.
तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी सुरू होतील. इयत्ता पहिली ते नववी, इयत्ता अकरावीचा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी अथवा त्यानंतर सुटीच्या कालावधीत लावता येईल तथापि तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. या नियमांनुसार शाळेच्या सुटी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत देखील शिक्षण उपसंचालक सर्व विभाग व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व जिल्हा परिषद यांना सुचित करण्यात आले आहे.
७६ सुट्यांचे नियोजनशाळांमधून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणाचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देश आपले स्तरावरून देणेबाबत उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.