आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यटन धोरणाला चालना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. इयत्ता ५ वी ते दहावीच्या विद्यार्थ्याना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगौलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्षात पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्षात एक शैक्षणिक सहल, अथवा ग्रामीण पर्यटनाला परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना सहलीला जाता आले नाही. यावर्षी हा मार्ग खुला झाला असून जास्तीत जास्त दोन मुक्कामाला परवानगी देण्यात आली आहे.
शालेय सहलीसाठी तालुका पातळीवरून परवानगी देण्यात येणार आहे. सहलीदरम्यान कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये व त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची निवड करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. महिला शिक्षिका विद्यार्थीनींसोबत राहतील याची सक्ती करण्यात आली आहे. समुद्र किनारे, बीच अतिजोखमीची पर्वतावरील ठिकाणी, नदी, तलाव, विहिरी तसेच उंच टेकड्या इत्यादी ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करताना पुरेशी काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांना गडकिल्ले दाखविण्यात यावे. विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेणार असल्यास सोबत प्रथमोपचार पेटी असावी स्थानिक डॉक्टरांचे तसेच जेथे सहल जाणार आहे तेथील शासकीय रुग्णालयाचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावे. सहलीचे नियोजन करतांना त्याचा आराखडा पालकांपर्यंत पोहचवला जावा पालकाच्या सूचनाही विचारात घ्याव्यात तसेच गरज भासल्यास पालकाचा एक प्रतिनिधी सहलीस सोबत ठेवावेत. सहलीला निघण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक राहिल.
लालपरीचा सहलीला हातभार
एसटी महामंडळाच्या लालपरीकडून शैक्षणिक सहलीसाठी विशेष अशी सूट देण्यात येते. या वर्षीही सहलीसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी सवलतींवर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थिनींसाठी महिला शिक्षक अनिवार्य
सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका तसेच शक्यतो एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर असणे आवश्यक राहील. सहलीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळेचे नामनिर्देशित केलेला पालक प्रतिनिधी (शिक्षक पालक संघ सभासद) यांच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणाचाही समावेश राहणार नाही. रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी. रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा. याचे नियोजन शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.