आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने पोलिस भरती करणार असल्याचे जाहिर केल्याने युवा वर्गामध्ये भरतीचे चैतन्य पसरले आहे. अकॅडमीद्वारे अथवा वैयक्तिक स्वरुपात तरुण- तरुणी मैदानी परीक्षा पास होण्यासाठी कसून सराव करत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्वच रस्ते आणि मैदाने ऐन थंडीतही बहरली आहेत. शहरासह तालुकाभरात हे युवा वर्ग मैदानावर सराव करत असून, पहाटे, सायंकाळीही व्यायामासाठी एकच गर्दी होत आहे.
देशसेवा आणि भोकरदनचे हे पुर्वांपार चालत आलेले नाते आहे. येथील माती कायमच देशसेवा शिकवत आली आहे. भोकरदन तालुक्यातील शाहिद उत्तम नामदे, राधाकिसन नामदे, शहीद रमेश सोनटक्के, शाहिद गोपाल कांबळे आदींसह जवानांची, कर्तबार पोलिसांची प्रेरणा कायमच भोकरदनच्या युवकांना देशसेवेसाठी खेचत असते. भोकरदन शहरासह तालुक्यातील मुले-मुलींना देशसेवेत, पोलीस दलात जायचा या हेतूने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक जवानांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. दरम्यान भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपुर, पेरजापुर, ईब्राहीपुर, बाभुळगाव, गोद्री, भायडीसह आदी गावेच्या गावे पूर्ण देशसेवेनी झपाटली आहेत. इथल्या प्रत्येक तरुणांच्या मनात सैन्यात जाऊन देशसेवा करायचे हे कायम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.