आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल व आरटीओ पथकाच्या ताब्यातून हायवा पळवणारे दोघे चंदनझिरा पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. जालना शहरातील एसटी वर्कशॉप जवळ वाळू नेणारा हायवा पकडला होता. दंडात्मक कारवाई करण्यासाठी चंदनझिरा पोलीस ठाण्यात नेल्या जात होता. परंतु चालकाने पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कुणाचेही न ऐकता भरधाव वेगाने टोल नाका पार करून फेज थ्रीजवळ नेला. या ठिकाणी वाळू खाली करीत असतांना पथकाने विरोध केला. परंतु यावेळी टिप्पर मधील दोघांनी लोखंडी टामीचा धाक दाखवून शासकीय कामात अडथळा केला.
नंतर लोटालोट करीत हायवा पळवून नेला. या प्रकरणी तलाठी भागवत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामेश पवार (चांदई एक्को), शेखर राजेंद्र वाघ ( टाकळी हिवर्डी) यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही संशयित आरोपींना टिप्परसह शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आहे. भरधाव टिप्परने टोल नाक्याचेही नुकसान संशयित आरोपींनी भरधाव वेगाने टोल नाका येथून भडगाव टिप्पर पळून नेल्याने या ठिकाणी नुकसान झाले आहे. याबाबत टोल नाका प्रशासनाने चंदनझिरा पोलिसांना पत्रव्यवहार केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.