आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:स्वतः भोवती फिरणारे कधीच मोठे होऊ शकत नाहीत : डॉ. देशमुख

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहारातील बन्सल क्लासेस व दै. मराठवाडा साथी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिलीप देशमुख यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. अनेक देशात जाऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केलेले आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सहवासात राहिलेल्या डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यासह पालकदेखील मंत्रमुग्ध झाले.

मोठं व्हायचं असेल तर जगाचा विचार करा. स्वतः भोवती फिरणारे कधीही मोठे होऊ शकत नाहीत असे ते यावेळी म्हणाले. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिलीप देशमुख, बंसल क्लासेस औरंगाबाद-जालनाचे संचालक जगदीश बियाणी, महाराष्ट्र राज्य सीईओ कैलास घुगे, संचालक विवेक शेळके, पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पीआय सुनील चाटे, जालना वकील संघाचे अध्यक्ष रामेश्वर गव्हाणे, संचालक पारस बोरा, एस एस कादरी, साेनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे डॉ. देशमुख म्हणाले की, जे तुमच्या चुका दाखवतात, रागावतात तोच तुमचा खरा मित्र, गोड बोलणाऱ्या पासून सावध रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. बंसल क्लासेसचे एस. एस. कादरी यांनी प्रस्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...