आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत कथा सोहळा:भगवंतप्राप्तीचा मार्ग अतिशय कठीण असला तरी नामस्मरणाने सोपा होतो; रामदास महाराज आचार्य यांचे निरूपण

अंबड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्म, ज्ञान व उपासना हे भगवंतप्राप्तीचे मार्ग कठीण असून केवळ भक्तिमार्ग, जो नामस्मरण रूपात करणे हा अत्यंत सोपा मार्ग असल्याचे भागवताचार्य रामदास महाराज आचार्य यांनी सांगितले.अंबड येथील चांगलेनगरात नगरसेवक शिवप्रसाद चांगले यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथा सोहळा सुरू आहे. भगवंताच्या दत्तावतारासह नृसिंह अवताराच्या कथेचे त्यांनी निरुपन केले. मनु आणि शतरुपा जे या जगातील मानव जातीला देणाऱ्या मनु शतरुपा यांच्या कथेने आरंभ केला. ज्या मनुने या पृथ्वीतलावर पाच हजार वर्षे राज्य केले. त्यांना दोन पुत्र व तीन कन्या. राजा उत्तानपाद सह, आपुती, देवहुती व प्रसुती या तीन कन्यापैकी देवहुती नावाप्रमाणेच देवप्रिय अशी भावीक व ईश्वराप्रती अगाध श्रद्धा असणारी होती.

जिने पुढे आपल्याच आवडीच्या धर्मपरायाण अशा कर्दम ऋषीशी विवाह केला. माऊलीच्या हरीपाठातील संतांच्या संगती मनोमार्ग गती या उक्तिला कृतीत उतरवून अखंड हरीचिंतनासह पती हाच परमेश्वर या पातिव्रत्य धर्माचरणी रत होती. पतीला विवाहानंतर तपश्चर्येला परवानगी देऊन आपल्या पतीची दहा हजार वर्षे वाट पाहिली. पुढे त्यांना नऊ कन्या व दहावा पत्र कपील मुनीला जन्म दिला. ज्या कपील मुनीला सांख्यतत्वाचा अधिष्टाता, निर्माता म्हणून जगन्मान्यता आहे. कपील मुनीने पुढे आपल्या आईलाच जगततत्वाचे ज्ञान दिले, ज्यात संसार हा विवेक व विचाराने करावा केवळ स्वार्था पोटी नव्हे हा मूळमंत्र सांगितला.

अनसुयेच्या पोटी जन्मलेल्या दत्तजन्माचे सुंदर आख्यान तृतीय कन्या प्रसुतीचा विवाह दक्षप्रजापतीशी व शेवटची कन्या सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. त्याच सतीने अग्णिमध्ये आत्मसमर्पणा सह पुनश्च पार्वती रुपात जन्म हे आख्यान रंगवून ध्रुव आख्यान व शेवटी नृसिंह अवताराची कथा भक्त प्रल्हादाच्या अनन्यसाधारण भक्तीचे वर्णन व प्रत्यक्ष नृसिंह अवताराचे सादरीकरण केले. यावेळी परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. कथेची सांगता शनिवारी ग्रंथ दिंडी आणि त्यानंतर महाप्रसादाने केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...