आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते:भारत जोडो यात्रेसाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबर रोजी दाखल होत असतांना जालना जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतील आणि तसेच वाशिम येथे जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी बैठकीत दिली.

जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रा संदर्भातील पुर्व तयारीसाठी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तर जिल्ह्याचे प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे, आर. आर. खडके, कल्याण दळे, राजेंद्र राख, सत्संग मुंढे, शेख महेमूद, प्रभाकर पवार आदींची उपस्थिती होती. भारत जोडो यात्रेत सहभागी होणे म्हणजे आपल्या जीवनाचा ऐतिहासीक क्षण आहे. खा. राहुल गांधी यांनी देशामध्ये बंधुभाव, शांतता प्रस्तापित करण्यासाठी आणि सामान्य जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळावे यासाठी भारत जोडो यात्रेची कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत संपुर्ण देशात हा संदेश पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

देशमुख म्हणाले, भारत जोडो यात्रा आपल्या राज्यामध्ये सर्वप्रथम नांदेड जिल्हयातील देगलूर येथे आगमन करीत आहे. राज्यामध्ये खा. राहुल गांधी यांच्या यात्रेचे भव्यदिव्य स्वागतासाठी जनता आणि कार्यकर्ते उत्सूक आहेत. जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते हे वाशिम येथे आयोजीत कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहे. या ठिकाणी खा. राहुल गांधी यांच्याशी कार्यकर्त्याबरोबर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

बैठकीत नवनियुक्त तालुका अध्यक्षांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आणि गुजरात येथील मोरबी पुल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. यावेळी एकबाल कुरेशी, राम सावंत, अण्णासाहेब खंदारे, केदार कुलकर्णी, बाबुराव सतकर, वसंत जाधव, त्रिबक पाबळे, लक्ष्मण म्हसलेकर, सुभाष मगरे, शरद देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, निळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, जावेद बेग, शेख शमशुद्दीन, हरी मसलगे पाटील, शितलताई तनपुरे, चंदाताई भांगडीया, नंदाताई पवार, मथुराबाई सोळुंके, मंजु यादव, अब्दुल रफिक, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चांदोडे, मनोहर उघडे, ॲड. देवराज डोंगरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...