आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॉन क्रिमिलियर ची अट रद्द करून ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, जातनिहाय जनगणना, न्यायव्यवस्थेसह सर्व क्षेत्रात आरक्षण लागू करावे, धान्य मालास हमीभाव, महागाई नियंत्रण अशा ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ,माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथील जंतर-मंतरमध्ये भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. यात मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. अशी माहिती रासपचे राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर यांनी दिली. ओबीसी, मागासवर्गीय घटक शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर रासपचे संस्थापक महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देत सहभाग घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.