आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नतमस्तक:नववर्षाला राजुरेश्वराच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

श्रीक्षेत्र राजूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरत्या वर्षाला निराेप अन् नवीन वर्ष सुखी, समृद्धीचे व आराेग्यदायक जावाे, अशी प्रार्थना करण्यासाठी महाराष्ट्रातील हजाराे भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजुरात दाखल झाले हाेते. ३१ डिसेंबर राेजी रात्री माेठ्या प्रमाणात भाविकांनी रजुरेश्वराच्या दर्शनासाठी हजेरी लावली हाेती. १ जानेवारी रविवार पहाटेपासून मंदिरात रीघ सुरू होती.

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात राजुरेश्वराच्या दर्शनापासून केली जाते. साडे तीन िपठापैकी पूर्ण पीठ नाभीस्थान आसणारा राजुरेश्वर नवसाला पावताे, अशी गाढ श्रद्धा भाविकांची आहे. नवीन वर्षाची सुरवात व येणाऱ्या काळात सर्वच कामे शुभ व्हावी, या अनुषंगाने महाराष्ट्रातील हजाराे भाविकांनी १ जानेवारी राेजी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली हाेती. सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी सुरू हाेती. मंदिराचा परिसर भाविकांनी फुल्ल झाला हाेता. अनेक भाविकांनी राजुरेश्वराचा अभिषेक करून नवस केला. नवीन वर्षानिमित्त वाहन खरेदी केल्यामुळे वाहनांची पूजा करण्यासाठी भाविकांनी आपली वाहने राजुरेश्वराच्या पायथ्याशी आणून पूजा केली.

नवीन वर्षात चांगले उत्पन्न व भरघाेस पाऊस पडू दे, शेतीमालास याेग्य भाव मिळू दे, असे साकडे शेतकरी बांधवांनी राजुरेश्वरास घातले आहे. गतवर्षी काेराेनाचे निर्बंध असल्यामुळे भाविकांना थेट दर्शनापासून वंचित राहावे लागले हाेते.

महाराष्ट्रातील कानाकाेपऱ्यातून दर्शनासाठी आले भाविक नवीन वर्षाची सुरवात राजुरेश्वराच्या दर्शनापासून करावी, अशी भाविकांची इच्छा आहे. त्यामुळे भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लावली हाेती. महाराष्ट्रातील कान्याकाेपऱ्यातून भाविक दर्शनासाठी आले हाेते. रात्री पर्यंत भाविकांची गर्दी सुरू हाेती. - गणेश साबळे, पुजारी, गणपती संस्थान, राजूर

बातम्या आणखी आहेत...