आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:नांदी येथे मौल्यवान दगडाची तस्करी करणाऱ्या तिघांना केली अटक

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील नांदी, मठजळगाव, किनगाव परिसरात जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर मौल्यवान रंगीत दगडाचा साठा असुन हा मौल्यवान दगड थेट अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चोरट्या मार्गाने जात असल्याच्या माहितीवरुन नांदी शिवारात पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी गुरुवारी कारवाई करीत तिघांना अटक केली.

नांदी शिवारातील शेतात जुबेर रज्जाक सय्यद, शेख मुनीर शेख भिकम, सय्यद गफार सय्यद हे तिघे विनापरवाना व बेकायदेशीररित्या विना रॉयल्टीसह नांदी शिवारातील शेतातुन उत्खनन करुन गारगोटीचे मौल्यवान गौण खनीज दगड काडुन सदर पीक अप मध्ये भरुन काळया बाजारात विक्री करण्यासाठी चोरुन घेवुन जात होते.

बातम्या आणखी आहेत...