आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:अकोलादेव येथे एकाच रात्री तीन घरफोड्या; माजी सैनिकांच्या घरीही अडीच लाखाची चोरी

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून एकाच रात्री तीन ठिकाणी जबरी घरफोडी करून सोन्याच्या दागीन्यासह रोख रक्कम असा अंदाजे अडिच लाखाचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. घटनास्थ्रळी श्वानपथक आणि ठसे तज्ञ बोलावण्यात आले होते.

टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अकोलादेव येथील बाबुराव शेषराव सवडे यांचे घरातील पेटीचे कडीकोंडा तोडून पेटीमध्ये ठेवलेले २५ हजार व पॅन्टच्या खिशातील १५ हजार, त्यांच्या शेजारी असलेले त्यांचे बंधू गजानन सवडे यांच्या घरातील सुटकेस मधील १५ हजार असे एकून ५० हजार रुपये लंपास करून चोरट्यांनी आपला मोर्चा नारायण भाऊसाहेब कदम फौजी यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या बंगल्याचे कटरच्या साह्याने कडीकोंडा तोडून सोन्याचे दागीने अंदाजे किंमत दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना सकाळी उघडकीस आल्याने घटनास्थळी सपोनि रविंद्र ठाकरे, बिट जमादार नारायण गिराम, प्रदीप धोंडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...