आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक कार्यक्रम:मराठी अर्थशास्त्र परिषदेचे जालन्यात तीन दिवस राष्ट्रीय अधिवेशन ; डॉ. गोविलकर करतील मार्गदर्शन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४५ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शहरातील जेईएस महाविद्यालयात पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, स्थानिक कार्यवाह प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. आर. बी. भांडवलकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आ. प्रताप अडसड, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जेईएसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड यांची उपस्थिती राहील. उद्घाटन सोहळ्यानंतर “आर्थिक सिद्धांत आणि प्रायोगिक पद्धती’ या विषयावर चर्चासत्र, सायंकाळी प्रा.नी.वि.सोवनी स्मृती व्याख्यानात “भारतातील बेरोजगारी निर्मूलन निश्चित दिशा आणि उपाय’ या विषयावर प्रा. अजित अभ्यंकर हे मार्गदर्शन करतील.

रविवारी पंधरावा वित्त आयोग : केंद्र -राज्य वित्तीय संबंधांची चिकित्सा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक विचार, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारताच्या आर्थिक विकासातील धोरणात्मक बदल (शेती, उद्योग, सेवा क्षेत्र ) या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे होणार असून डॉ. सुभाष पाटील, डॉ.धनश्री महाजन, डॉ. प्रशांत हरमकर यांचा सहभाग राहणार आहे. सोमवारी माजी अध्यक्ष डॉ. स.ह.देशपांडे स्मृती व्याख्यानात “भारतातील वाढत्या आर्थिक विषमतेचे आव्हान, व्याप्ती, परिणाम आणि उपाय’या विषयावर माजी कुलगुरू तथा माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान, “शास्त्र अर्थपूर्ण जीवनाचे” या विषयावर अर्थतज्ज्ञ आशुतोष रारावीकर यांचे मार्गदर्शन, सर्वसाधारण सभा, प्रमाणपत्र वितरण, दुपारी आमदार कैलास गोरंट्याल , आर्थिक विचारवंत डॉ. विनायक गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होईल. या वेळी माजी उपसभापती भास्करराव दानवे, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जेईएसचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. डी. काबरा, परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश निकम,अर्थ संवादचे संपादक डॉ. राहुल म्होपरे यांची उपस्थिती असेल. पत्रकार परिषदेस परिषदेचे खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. सुशील सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...