आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:रोहित्रावरील तीन गट्टू जळाले, धावड्यातील समतानगर अंधारात

भोकरदन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील समतानगर भागातील ३८० ग्राहकांनी वीज मीटर बसविले असून त्यांना सुरळीत वीज पुरवठयासाठी स्वतंत्र रोहित्राची आवश्यकता आहे. परंतु सध्या असलेल्या तीन गट्टूच्या एका रोहित्रावर भार जास्त झाल्याने गट्टू जळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच दिवसांपासून तीनही गट्टू जळाल्याने समतानगर परिसर अंधारात आहे.

वीज कर्मचारी दररोज इतर दुसऱ्या रोहित्रावरून वीज जोडणी करुन देत आहेत. परंतु त्याही रोहित्रावरील भार वाढून रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडीत होत आहे. विशेष म्हणजे या परिसरासाठी तीन रोहित्राची गरज आहे. परंतु एकाच रोहित्रावर वीज पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून ठराव घेऊन रोहित्रासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. परंतु धावडा ग्रामपंचायतला कायम स्वरुपी ग्रामसेवक नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. दरम्यान, येथील तरुणांनी नुकतेच रोहित्रा संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, जळालेले गट्टू कर्मचाऱ्यांनी रोहित्रावरून खाली उतरूण ठेवले आहे. परंतु फिल्टर विभागात ऑईल नसल्याने नवीन गट्टू मिळाले नाहीत आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. नवीन गट्टू मिळताच बसवून सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, असे भोकरदन येथील प्रभारी उपअभियंता व्ही. व्ही. थिटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...