आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबीर:नेत्र तपासणी शिबिराचा तीनशे रुग्णांना लाभ; 25 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया

बदनापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या न्यू लाइफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात ३०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सर्व रुग्णांना मोफत औषधी देखील वाटप करण्यात आले.

बदनापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी बदनापूर न्यू लाइफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी तालुक्यातील भराडखेडा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला सरपंच भगवान बारगजे यांनी विशेष सहकार्य केले. मोफत नेत्र तपासणी शिबिरात ३०० रुग्णांनी सहभाग घेऊन नेत्र तपासणी करून घेतली असता २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली आहे तर शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधी देखील देण्यात आली.

यापूर्वी हिवरा राळा व चणेगाव येथे घेण्यात आलेल्या शिबिरातील ५७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालयात २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...