आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तगत:जांबसमर्थ येथील तीन मूर्ती हैदराबाद शहरातून जप्त ; पोलिसांची कारवाई

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणात पोलिसांनी हैदराबाद येथील गौरीशंकर लादुरामजी वर्मा या संशयिताच्या घरातून आणखी तीन मूर्ती हस्तगत केल्या आहेत. हनुमानाच्या दोन व एक श्रीराम-सीतामातेची मूर्ती हस्तगत केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संशयित शेख जिलानी हुसेन शेख (२८), राजू शेख हुसेन शेख (२८, दोघे रा. उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (३१, रा. वैराग, जि. सोलापूर), शेख पाशामियाँ शेख मशाकसाब (३२, रा. बिदर) व गौरीशंकर लादुरामजी वर्मा (५९, रा. हैदराबाद) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अगोदर शेख जिलानी हुसेन शेख, राजू शेख हुसेन शेख, महादेव चौधरी, शेख पाशामियाँ यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून जवळपास १० मूर्ती हस्तगत केल्या होत्या. नंतर पोलिसांनी हैदराबाद येथून मूर्तींची खरेदी करणारा गौरीशंकर वर्मा याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने मूर्ती खरेदी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, या मूर्ती सोलापूर येथून कुरिअरने पाठवण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

पोलिसांचे एक पथक पुन्हा हैदराबाद येथे गेले. तेथे गौरीशंकर वर्मा याच्या घराची झडती घेतली असता, घरात जवळपास तीन मूर्ती सापडल्या. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास १३ मूर्ती हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, संजय लोहकरे, मरळ, पोलिस अंमलदार रामप्रसाद रंगे, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, रामेश्वर जाधव, सागर बाविस्कर, श्यामसुंदर देवडे, मनोज काळे, हरीश वाघमारे, उमेश राठोड, श्यामसुंदर देवडे, वसंत राठोड, गजानन मुरकुटे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...