आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:सिलिंडरच्या स्फोटात तिघे जखमी, सिद्धिविनायक नगरातील घटना

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील सिलिंडरमधून अचानक गॅस गळती हाेऊन स्फोट झाल्याने शनिवारी दि.१९ राेजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दाेन महिलांसह एक जण भाजला. यातील दोघींना औरंगाबाद येथील रूग्णालयात हलवण्यात आले. एका व्यक्तीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ताराबाई केशव जाधव (वय ६५), मीना दिलीप घारे (३८) व अनंता दत्ता मंडलिक (४५, (सिध्दीविनायक नगर, जुना जालना) अशी जखमींची नावे आहेत.

जुना जालना परिसरातील सिध्दीविनायकनगर येथील ताराबाई केशव जाधव यांच्या घरातील भाडेकरू मीना दिलीप घारे या घरात स्वयंपाक करीत होत्या. त्याच वेळी ताराबाई जाधव याही तेथे आल्या होत्या. दोघींच्या गप्पा सुरू असताना घरातील गॅस सिलिंडरमध्ये अचानक लिकेज होऊन स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाल्याने मीना घारे यांच्या साडीने पेट घेतल्याने आग विझवण्यासाठी ताराबाई याही धावल्या. यात दोघींचाही आरडाओरड सुरू असताना शेजारील किराणा दुकानदार अनंता दत्ता मंडलिक यांच्यासह आग विझवण्यास सुरूवात केली. यात दोन्ही महिला भाजल्याने गंभीर जखमी झाल्या तर अनंता मंडलिक हे देखील गॅसच्या वाफेने भाजले.

बातम्या आणखी आहेत...