आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त:एलसीबीकडून तीन दारूचे अड्डे उद्ध्वस्त

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या दारूनिर्मिती करणाऱ्या तीन हातभट्टया उद्ध्वस्त केल्या. या कारवाईतून ४ लाख ९२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

कदीम ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैधरीत्या दारूनिर्मितीची माहिती ठाण्यातील बिट अंमलदाराला नसते का, माहिती असेल तर ते कारवाई करीत नाहीत, एलसीबी पथकालाच का कारवाई करावी लागते, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. दरम्यान, वारंवार एलसीबीच अवैध दारू निर्मितीबाबत कारवाया करीत असल्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हे ठाण्याचे पोलिस निरीक्षक, बिट अंमलदार यांना कारणे दाखवा नोटीसही काढतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दारूच्या भट्ट्या नष्ट करण्यासाठी पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय प्रमोद बोंडले अादींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...