आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारू:अवैध दारू विक्रीप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनापरवाना दारू विक्री व हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करुन तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जालना परतूर, चंदनझिरा, भोकरदन पोलिसांनी कारवाया केल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून याबाबत चोऱ्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्या जात आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने या कारवाया केल्या जात आहेत. या कारवायानंतर काही दिवस हे धंदे बंद असताना नंतर पुन्हा संबंधित लोक पुन्हा आपले अवैध धंदे सुरू ठेवतात अशा तक्रारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...