आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय देण्याची मागणी:परीक्षा उत्तीर्ण होऊनही आन्वा पाडाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

आन्वा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बलघटक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊनही शिष्यवृत्तीसाठी तीन वर्षांपासून वंचित आहेत. याबाबत चौकशी करून न्याय देण्याची मागणी पालकांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे केली आहे. आन्वा पाडा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अजिंक्य लक्ष्मण खराटे, रामेश्वर काशिनाथ राऊत, ज्ञानेश्वर शहाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

या संदर्भात विद्यार्थ्याच्या नावांची यादी मुख्याध्यापकांनी जालना कार्यालयाकडे दिली. मात्र, तीन वर्षांपासून या विद्यार्थाना शिष्यवृत्तीचा अद्यापही लाभ मिळालेला नाही. पालक वारंवार मुख्याध्यापकांना विचारणा करतात. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अजिंक्य खराटे या विद्याथार्ंची जन्मतारीख, गुण आणि मोबाईल क्रमांक यात चुका केलेल्या आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक मोरे यांची चौकशी करुन शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पालकानी केली आहे. यापूर्वी २५ एप्रिल रोजी गटशिक्षणाधिकारी भोकरदन, २७ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. परंतु काहीच कार्यवाही झाली नाही. आपण स्वत:हा याप्रकरणी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...