आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने चोरट्यांनी लंपास केले:आठ दिवसांमध्ये तीन महिलांचे दागिने पळवले

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीतून महिलांचे दागिने लंपास करणारी टोळी जालना शहरात सक्रिय झाली आहे. दुर्गामाता यात्रोत्सवातून मागील काही दिवसांमध्ये तीन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. यामुळे महिलांनी गर्दीच्या ठिकाणी दागिने सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे.नवरात्रोत्सवानिमित्त गरबा, दांडियासाेबतच काही ठिकाणी यात्रोत्सवही सुरू होते. दरम्यान, दुर्गाामाता मंदिर परिसरात मोठी यात्रा असल्याने नेहमीच गर्दी हाेते.

या यात्रोत्सवातून तीन महिलांच्या अंगावरील दागिने चोरीस गेले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मुद्देमाल लंपास करीत आहेत. २ ऑक्टोबर रोजी उमा अविनाश राठोेेड (रा. इन्कमटॅक्स कॉलनी, जालना) या गर्दीतून जाताना अज्ञात चोरट्याने त्यांचे १९ हजार रुपयांचे डोरले, मणी चोरून नेले.

याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल केदार या करीत आहेत. चार दिवसांपूर्वीच याच मार्गाहून एका महिलेच्या अंगातील दागिने चोरीस गेल आहेत. अन्य एका घटनेतही एका महिलेचे दागिने चाेरीला गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...