आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरी:अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या  आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी तीन वर्षांची सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. आकाश नारायण पांडव (१८, रा. श्रीकृष्णनगर, रांजणगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

१४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरातील मंठा चौफुली येथे आरोपीने अल्पवयीन मुलीला कॉल करून हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बोलावले. त्यानंतर मुलीने फोन ठेवून दिला. त्यानंतर पीडित मुलगीही मेडिकलमध्ये गोळ्या आणण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा हात पकडून छेडछाड केली. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत खांडेकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...