आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:कँडल मार्च, व्याख्यानमाला अन् प्रतिमापूजनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

टीम दिव्य चमू | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय- निमशासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, सामाजिक संस्था, बँका, पक्ष कार्यालय आदी ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ नागरिक मंच
जालना |
ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेङकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, मोहन राठोड, रामेश्वर वाघमारे, धर्मराज खिल्लारे, प्रा.राजकुमार बुलबुले, वसंत खिल्लारे, अतुल इंगळे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

धम्म दीप संघ
जालना |
धम्म दीप संघातर्फे मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना विजयकुमार पंडीत म्हणाले, विषमते विरूद्ध लढाईत मानवतेची स्थापना करतांना महामानव, प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, विचार, मानव कल्याणाची तत्वे, अंमलात आणने प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य असून हीच त्यांना खरी आदराजंली ठरेल. यावेळी विक्रम सरवदे, पद्मनाथ क्षीरसागर, प्रभाकर घेवंदे, राजेश राऊत, शेख नूर यांची उपस्थिती होती.

सोमनाथ ग्रामपंचायत
सिंधी काळेगाव |
जालना तालुक्यातील सोमनाथ ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच द्रौपदी हानुते, माजी सरपंच राजेश पवार, सुरेश एखंडे, पंडित गाढे, गजानन गाढे, राम एखंडे, विठ्ठल एखंडे, कैलास एखंडे, भरत एखंडे, गजानन शिंदे, कृष्णा शिंदे, आदित्य पवार, अमोल पवार, धनंजय एखंडे, आदिनाथ एखंडे, शिवाजी गाढेसह आदी उपस्थित होते.

प्रज्ञा धम्मदीप बुद्धविहार
जालना |
येथील प्रज्ञा धम्मदिप बौध्द विहार भाग्योदयनगर येथे विश्वरत्न क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी तहसीलदार आर.जे.मघाडे, माजी उपशिक्षणाधिकारी महाजन, सोनकांबळे, इंदुताई गायकवाड, गंगाधर अंभोरे, जाधव, मस्के, बाळु जाधव, मायादेवी खरात, जिजाबाई ठोंबरे, द्रौपदीबाई मघाडे, माया गायकवाड, संध्या ठोंबरे, दमयंती पैठणे, पुष्पा धनेधर, जिजाबाई बेडेकर, पार्वतीबाई जाधव, पात्रे, सुलक्षणा गायकवाड, रेखा खरात, संघमित्रा नवगिरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बुध्दवंदना घेण्यात आले.

दानकुंवर महाविद्यालय
जालना |
येथील श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संचालक नरेश अग्रवाल, प्र. प्राचार्य प्रा. डॉ. विजय नागोरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी, प्रा. डॉ. जे. जे. अहिरराव, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुधाकर वाघ, डॉ. झेड. बी. काझी, डॉ. स्वाती महाजन, डॉ. बी. जी. श्रीरामे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्र. प्राचार्य प्रा. डॉ.विजय नागोरी आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.श्रीरामे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

राजर्षी शाहू विद्यालय
पारध |
भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बाल सभेचे अध्यक्षा सायली लोखंडे, सूत्रसंचालन अश्विन पाटील तर वैष्णवी तबडे या विद्यार्थिनीने आभार केले. प्रा. अनिल मगर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक विलासराव लोखंडे, प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे, उपप्राचार्य अमोल बांडगे, महर्षी पराशरऋषी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बावणे, किशोर वाघ, ज्ञानेश्वर अल्हाट, राजेंद्र जाधव, विवेक अवसरमोल, विवेक पऱ्हाड, स्वप्निल वाघ, धनजय भोसले, लक्ष्मण खरात, कापरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

सिद्धार्थ महाविद्यालय
जाफराबाद ।
येथील सिद्धार्थ महाविद्यालयात मूल्य व सांस्कृतिक समितीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य, डॉ. शाम सर्जे, उपप्राचार्य डॉ. र. तु. देशमुख, प्रा.मनिष बनकर, डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. बनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी, प्राध्यापक, सर्व जातीधर्माच्या लोकांना भारतीय संविधानात समता, स्वतंत्र आणि न्याय कसे मिळवून दिले याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. र. तु .देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शेतीविषयक, महिलासाठी, नोकरदार यांना कशा प्रकारे न्याय मिळवून दिला याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. एस. एम. पाटील यांनी तर प्रा. अनिल वैद्य यांनी त्रिशरण -पंचशील ग्रहण करून घेतले. सुत्रसंचालन प्रा. सारिता मणियार यांनी तर प्रा. सुनंदा सोनुने यांनी आभार मानले.

महाराष्ट्र बँक, बदनापूर
बदनापूर |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक धीरेन्द्रकुमार सोनकर, आशिष आझाद, जी. एस. लखमले, डी. बी. डवणे, राहुल मगरे, अनिकेत खोब्रागडे, अशोक जगधने, अमोल पारवे आदी उपस्थित होते.

युवा सेना, जालना
जालना |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना युवासेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युवासेना विस्तारक भरत सांबरे, जिल्हाप्रमुख शिवाजी शेजुळ, विजय पवार, अ‍ॅड.भास्कर मगरे, दर्शन चौधरी, गणेश लाहोटी, आकाश टेकुर,शिवाजी मुळे, जय भगत आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रमाता महाविद्यालय
जालना |
येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्रा.डॉ. शोभा यशवंते यांची उपस्थिती होती. डॉ. तिडके यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचारांना उजाळा दिला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य महापुरुषांनी केलेले आहेत शिक्षण क्षेत्रात चांगुलपणा निर्माण झाला पाहिजे व त्याला सत्य म्हणण्याची ताकद जनमानसात निर्माण झाली पाहिजे असे सांगितले. तर प्रा. डॉ. शोभा यशवंते यांनीही संविधान विषयक विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष देशपांडे यांनी तर प्रा. विजयमाला घुगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बारवाले महाविद्यालय
जालना |
येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. कविता प्राशर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रियदर्शन भवरे, डॉ. निशिकांत लोखंडे, प्रा. राजक्रांती वलसे, डॉ. निलेश बर्डे, डॉ. रवींद्र शिंपी, प्रा. संतोष इप्पर, डॉ. नंदकिशोर शिंदे, प्रा. पवन देशमुख, प्रा. राहुल धाकडे, प्रा.वर्षा वानखेडे, प्रा.मयुरी अंभोरे प्रा.अश्विनी पठाडे, प्रा. निधी तिवारी, राम हिवरेकर, विजय लोणकर, पित्ती, नरेंद्र देशमुख, रामभाऊ वाघमारे, वसंत नरवडे, भीमराव मोरे, रवी काळे आदींची उपस्थिती होती.

संविधान जनजागृती संघ
जालना |
‘संविधान जनजागृती संघ जालनाच्या वतीने मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आले. यावेळी सुदामराव सदाशिवे, डी.आर.हिवराळे, प्रकाश गडवे, सदानंद टवले, फेरोज अली मौलाना, मिलिंद धन्नेधर, भिमराव पैठणे, एस.आर.साबळे, अंकुश दांडगे, आर. एल. गवई, डी. एम. बिराडे, केशव पगारे, चंद्रमणी गाढेकर, राजेश राऊत, भारत खंदारे, प्रकाश बोडले, शरद नरवडे, राजभोज, आत्माराम लहाने, जे.ई. होर्शिल, आर. एल. बनसोड, साहेबराव मनवर, एस. टी. पाडमुख, शमशोद्दीन अन्सारी, शिवलाल आगशे, गोपीकिशन नाटेकर, प्रमोद चव्हाण, बी. बी. कुंडलकर, टिपले आदींची उपस्थिती होती.

भोयारेश्वर विद्यालय
धावडा|
भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील महर्षी भोयरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कै. लक्ष्मीबाई प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिनाबद्दल बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. चव्हाण यांच्यासह प्राध्यापक शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल
सिंधी काळेगाव |
जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवानराव खैरे, अण्णाभाऊ भालमोडे, शंकर सांगळे, अरुण काळे, विजय बोरुडे, हरिष खराडे, गोवर्धन क्षीरसागर, सागर झोटे, भगवान खरात, भगवान खांडेभराड, शाम पुंड, कैलास भदर्गे, मैंद, विद्या खैरे , सिंधु घोलप, सरस्वती गिराम, वैशाली म्हस्के, माया भालमोडे, प्रतिभा सुरडकर, दिपाली सोसे, अश्विनी ढोले, सोनु वाजगे, नम्रता मोठे, सुनीता पवार, मेबल गुढेकर, वर्षा भुतेकर, स्वाती मेंढरे, पूजा पवार, सुमित्रा खोतकर, प्रियंका सोनुने, शायनी जोसेफ आदी उपस्थित होते.

कें.प्रा.शा. सिंधी काळेगाव

सिंधीकाळेगाव | जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मराठी व उर्दू माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब रणशुर, केंद्रप्रमुख सुजाता भालेराव, अशपाक, सरपंच सुभाष गिराम, शालेय व्यवस्थापन समिती गजानन गिराम, विष्णुपंत गिराम, रामराव बारोकर,अनिल फुपाटे, उज्ज्वला जाधव, कल्पना तळेकर, रिजवाना, नाहेदा, चंद्रकला जोगदंड, जयराम गिराम, शेख अय्युबभाई आदी उपस्थित होते.

मत्स्योदरी ज्ञान मंदिर
अंबड |
येथील मत्स्योदरी ज्ञानमंदिर प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एल. जे. कोळकर, एस. एन. भाकरे, यु. टी. विटोरे, ए. आर. लोंढे, आर. व्ही. बारवकर, डी. के. खरे, एस. बी. बोरुडे, पी. डी. कदम, एस. बी. मोरे, एस. बी. बोरुडे, बी. पी. ढेंबरे, टी. ई. मोताळे, यमुना बचाटे, एस. आर. गाडेकर आदी उपस्थित होते.

तक्षशिला बुद्धविहार
जालना |
येथील समर्थ नगर येथील तक्षशिला विहारात महापरिनिर्वाण दिनानिमित्त तक्षशिला बौध्द विहाराचे अध्यक्ष उपासक भिकाजी साळवे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी अशोक गंगावणे, महेंद्र शिंदे, अशोक साळवे, शोभाबाई खरात, छायाबाई साळवे, संगिता गंगावणे, मिनाबाई शरणागत, साक्षी गंगावणे, वैशाली साळवे,अर्चना साळवे, अस्मिता साळवे, वंदना उगले, धनश्री पगारे, सुशांत साळवे, आश्र्वजित साळवे, सुमनबाई वाघमारे, नंदाबई झीने, गहुजी शिंदे, गयाबाई शिंदे, माधवराव पवार, निकम बि. एस. अरुण साळवे आदी उपस्थित होते.

देशमुख महाविद्यालय
भोकरदन |
जनविकास शिक्षण संस्था भोकरदन संचलित स्व अॅड. भाऊसाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालय जोमाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विश्वास तळेकर, आर. आर. त्रिभुवन, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, बाबासाहेब खिल्लारे, गौतम खाडे, गुणरत्न मगरे, भुषण शास्त्री, ऋषीकेश बावसकर, सुरेश बावसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

दानवे प्राथमिक शाळा
धावडा |
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक शाळेत महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, गीते सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक कौतिक खडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर, सुनील डोंगरे, किरण सपकाळ आदींची उपस्थिती होती.

ब्ल्यू टायगर मित्रमंडळाने काढला कॅन्डल मार्च
जालना | ब्ल्यू टायगर मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. हा कॅन्डल मार्च नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला. त्यानंतर शनिमंदिर, गांधी चमनमार्गे मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र रत्नपारखे यांनी केले होते. हा कॅन्डल मार्च उपक्रम गेल्या २० वर्षापासुन राबविण्यात येत आहे व पुढे असेच सुरू राहील असे महेंद्र रत्नपारखे यांनी सांगितले.

यावेळी बीएसफोरचे अध्यक्ष प्रमोद खरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, भास्कर रत्नपारखे, स्वप्नील गायकवाड, राहुल रत्नपारखे, राहुल तायडे, रवि खरात, सतिष हिवाळे, दिपक बोबडे, सुनिल पाडमुख, सागर सोनवणे, आकाश शिंदे, रवि पाडमुख, रमेश धांडे, भरत टापरे, रविंद्र पवार, संजय रत्नपारखे, शुभम रत्नपारखे, आकाश रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, प्रतिक लांडगे, जेतकुमार रत्नपारखे, कुणाल आढाव, शुभम घेवंदे, बंटी वाघ, बंटी बडगे, सचिन लाखे यांच्यासह भिम सैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...