आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र गणपती मंदिर राजूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास विभागाने ५ कोटी ८५ लाख ५० हजारांचा निधी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. यातून मंदिर परिसरातील अंतर्गत रस्ते, हायमास्ट, बगिचा, डोंगरघाटाचा विकास केला जाणार आहे. यामुळे भाविकांना अद्ययावत सुविधा मिळणार असून, राजूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
ग्रामविकास मंत्रालयाकंडून विविध विकासकामांसाठी २३ काेटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला हाेता. यात पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारकडून १२ काेटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला हाेता. यातील ३१ जुलै २०१९ रोजी ४ कोटी ८० लाख, तर ३० मार्च २०२१ रोजी २०२१ रोजी ७ कोटी ४५ लाख ६ हजार रुपये मिळाले आहेत. यातून हाती घेतलेली विविध विकासकामे पूर्णत्वाकडे आली अाहेत. मात्र, दीड वर्षापासून निधी वितरण रखडले होते. आता निधी मिळाल्याने कामे पूर्ण होतील.
सत्तांतरामुळे रखडली होती कामे कोरोनामुळे २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित झाले व पुढे वर्ष-दीड वर्ष कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती राहिली. यामुळे कामांची गती मंदावली.पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यामुळे विद्यमान शासनाने कामांना स्थगिती दिली. यामुळे मंजूर कामांचे निधी वितरणही थांबले होते. मात्र, यासाठी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून झालेल्या पाठपुराव्यानंतर कामे पूर्ववत सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शवत निधी वितरित केला.
भाविकांचे आराध्य दैवत महाराष्ट्रासह देश-विदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी दीड ते दाेन काेटी भाविक हजेरी लावतात. उत्तरोत्तर भाविकांची संख्या वाढत गेल्यामुळे येथील पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. विकास निधी मिळाल्याने अद्ययावत सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
उर्वरित कामे होणार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे मुबलक निधी प्राप्त झाला असून यातील कामे प्रगतिपथावर आहेत. नुकत्याच मिळालेल्या निधीतून उर्वरित कामे केली जातील. -प्रशांत दानवे, कार्यालयीन अधीक्षक, गणपती संस्थान, राजूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.