आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायमास्ट:मुख्य रस्त्यावर दोन प्रवेशद्वारे, हायमास्ट, बगिचाही फुलणार

जालना / श्रीक्षेत्र राजूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र गणपती मंदिर राजूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास विभागाने ५ कोटी ८५ लाख ५० हजारांचा निधी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. यातून मंदिर परिसरातील अंतर्गत रस्ते, हायमास्ट, बगिचा, डोंगरघाटाचा विकास केला जाणार आहे. यामुळे भाविकांना अद्ययावत सुविधा मिळणार असून, राजूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

गणपती संस्थानच्या वतीने वर्ष २०१८ मध्ये २५ काेटी रुपयांचा कृती अाराखडा तयार करून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला हाेता. दरम्यान, ग्रामविकास मंत्रालयाकंडून विविध विकासकामांसाठी २३ काेटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला हाेता. यात पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारकडून १२ काेटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला हाेता. यातील ३१ जुलै २०१९ रोजी ४ कोटी ८० लाख, तर ३० मार्च २०२१ रोजी २०२१ रोजी ७ कोटी ४५ लाख ६ हजार रुपये मिळाले आहेत.

यातून हाती घेतलेली विविध विकासकामे पूर्णत्वाकडे आली अाहेत. मात्र, दीड वर्षापासून निधी वितरण रखडले होते. यातच सत्तांतर झाले व शासनाकडून विविध विकासकामांना स्थगिती तसेच निधी वितरण थांबवण्यात आले. यामुळे पुढील कामांना ब्रेक लागला होता. मात्र, १ डिसेंबर २०२२ रोजी ५ कोटी ८५ लाख ५० रुपयांचा निधी थेट जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग केल्यामुळे विकास आराखड्यातील कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राप्त निधीतून होणार विविध कामे
मंदिर परिसरात दर्शन रांग संकुल, सभागृह, ध्यान मंदिर अादी कामे पूर्णत्वाकडे आली अाहेत. आता प्राप्त झालेल्या निधीतून अंतर्गत रस्ते, हायमास्ट दिवे, गार्डन, डाेंगरघाट, वाॅटर फाउंटेन, मुख्य रस्त्यावर दाेन मुख्य प्रवेशद्वारे, सुशाेभीकरण आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

कोरोना,सत्तांतरामुळे रखडली होती कामे
कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित झाले व पुढे वर्ष-दीड वर्ष कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती राहिली. यामुळे कामांची गती मंदावली. यातच पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यामुळे विद्यमान शासनाने कामांना स्थगिती दिली. यामुळे मंजूर कामांचे निधी वितरणही थांबले होते. मात्र, यासाठी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून झालेल्या पाठपुराव्यानंतर कामे पूर्ववत सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शवत निधी वितरित केला. यातून श्रीक्षेत्र राजूरच्या विकासासाठी निधी मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...