आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना सल्ला:वेळ, खर्चात बचत करणारे ड्रोन तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रसामग्रीच्या माध्यमामधून सध्या शेती करण्याची गरज आहे. मोठी पिके, बदलते वातावरण, अपुरे मनुष्यबळ यावर मात करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त आहे. सध्या तंत्रज्ञान अडचणीत सापडले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतामध्ये फवारणीसाठी यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राजुरीचे डॉ. सुनील गारटीवार यांनी केले.

कृषी विज्ञान मंडळाच्या ३०० वे मासिक चर्चासत्र कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त तथा कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे संचालक विजयअण्णा बोराडे हे उपस्थित होते, तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सुनील गोरटीवार (विभागप्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), घनश्याम इंगळे (शास्त्रज्ञ, पुणे), नाबार्डचे तेजल क्षीरसागर आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस व्ही सोनुने हे उपस्थित होते.

या वेळी नाबार्डचे तेजल क्षीरसागर, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर यावर घनश्याम इंगळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयअण्णा बोराडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी हवामान बदलावरसुद्धा नियोजन करावे आणि त्यानुसार पीक पद्धतीचा अवलंब करावा. अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार कृषी विज्ञान मंडळाचे शेतकरी बाबूराव कदम यांनी मानले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.

भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढवणे शक्य
ड्रोन वापरासाठी यापूर्वी २० ते २५ प्रकारच्या परवानग्या लागायच्या, आता फक्त पाचच प्रकारच्या परवानग्या लागतात. प्रशिक्षित पायलट असणे गरजेचे आहे, त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामीण युवक यांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढवणे शक्य असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...