आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या‎:नापिकीला कंटाळून‎ तरुण शेतकऱ्याची‎ आत्महत्या‎

दिंद्रुड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.)‎ येथील शेतकऱ्याने नापिकीला‎ कंटाळून गळफास घेत आत्महत्या‎ केल्याची घटना काल शनिवारी‎ (दि ०४) सकाळी उघडकीस‎ आली.‎ लहू उर्फ कुणाल रघुनाथ‎ उजगरे ( २४वर्ष) असे‎ शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या‎ नापिकेला कंटाळत कर्जबाजारी‎ झाल्याने हिंगणी बु. शिवारातील‎ एका लिंबाच्या झाडाला गळफास‎ घेत आत्महत्या केली. काही‎ वर्षांपासून पिकाची नासाडी व‎ पिकांना बाजारभाव कमी येत‎ असल्याने सदर शेतकरी‎ शेजाऱ्यांना व मित्रांना बोलून‎ दाखवत असे.‎

अनेक दिवसांपासून तो याच‎ विवंचनेत होता. पैसा नसल्यामुळे‎ मला आत्महत्या करावीशी वाटते‎ असेही तो म्हणत असल्याचे‎ त्याच्या मित्रांनी सांगितले.‎ पोलिसांना घटनेची माहिती‎ मिळताच घटनास्थळी दाखल होत‎ पंचनामा करून प्रेत उत्तरीय‎ तपासणीसाठी धारूर येथील‎ शासकीय ग्रामीण रुग्णालयात‎ दाखल केले. सायंकाळी उशिरा‎ हिंगणी गावात मयत लहू उजगरे‎ वर अंत्यसंस्कार करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...