आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखाना:उसाचे पैसे थकले, शेतकऱ्यांनी घेतली साखर आयुक्तांकडे धाव; कारखान्याला ऊस देऊन 80 दिवस उलटले

आष्टी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गोड ऊसाची कडू कहाणी संपता संपेना. कारखान्याला ऊस पाठवून ८० दिवस झाले तरी कारखाना ऊसाचे पैसे देत नसल्याने ते मिळवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे.

आष्टी व परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, बागेश्वरी साखर कारखान्याच्या विश्वासावर यंदाच्या हंगामात मोढ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती. मात्र कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस हा कारखान्याच्या गाळप क्षमते पैक्षा अधिक झाल्याने या हंगामात ऊस गाळप होतो की नाही म्हणुन शेतकरी ‌चितेंत होतें. बागेश्वरी कारखान्याने पुणे येथील बळीराजा साखर कारखान्यासोबत करार करुन अतिरिक्त ऊस पाठवला आहे.

मात्र ऊस जाऊन तब्बल ८० दिवस झाले तरी कारखान्यांकडून अद्याप ऊसाचा पहिला हप्ता दिलेला नाही. तसे पाहिले तर सहकार आयुक्त आदेशानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी पासून १४ दिवसांच्या आत पेमेंट देणे बंधनकारक आहे. तरी बळीराजा साखर कारखाना ऊसाचा पहिला हप्ता दिला नाही. यांच्याकडून थकलेल्या हप्त्याचे व्याजासह पैसे मिळावेत अशा आशयाचे निवेदन विजय लोणीकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...