आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगाम:तीर्थसागरचा पहिला गळीत हंगाम शुरू

तिर्थपुरी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने ऊसउत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याने या अतिरिक्त उसाला आधार म्हणून गुऱ्हाळाचा चांगला पर्याय उपलब्ध होत असून अनेक ठिकाणी गुऱ्हाळ सुरू होत आहेत. तालुक्यातील जोगलादवी परिसरात चार ते पाच गुऱ्हाळ सुरू झाले आहेत. याच परिसरात तिर्थसागर ऍग्रो नावाने जालना जिल्ह्यातील पहिला अत्याधुनिक गुळ कारखाना उभा राहिला असून सोमवारी २१ रोजी या गुळ कारखान्याचे साडेगाव श्रीराम मंदिर मठ संस्थानचे मठाधिपती सुरेश महाराज रामदासी यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सागर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, उल्हासराव पवार, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार, शिवाजीराव बोबडे, प्रभाकर पवार, विजय खरात, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानोबा मुळे, गुळ कारखान्याचे अध्यक्ष गणेश पवार, कार्यकारी संचालक संजय खरात, अंकुशराव बोबडे, श्रीराम गिरी, विजय चिमणे, लवलेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. तिर्थसागर गुळ कारखाना हा वर्षातील बाराही महिने सुरू राहणार असून कारखाना चालू हंगामात ऊसाला प्रतिटन दोन हजार रुपयांचा भाव देणार असून जून ते ऑक्टोबर या दरम्यान येणाऱ्या ऊसाला २ हजार ५०० चा भाव देणार असल्याचे संबंधितांनी यावेळी सांगितले. दरम्यान जोगलादेवी परिसरात उभे राहिलेल्या चार ते पाच गुळ युनिटमुळे शेतकऱ्यांच्या ऊस जाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...