आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:जिल्ह्यात करणार सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित कार्यक्रम होणार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ६ ते १६ एप्रिलदरम्यान सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी दिली.

समाजकल्याण कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घवले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ६ एप्रिल रोजी सामाजिक समता कार्यक्रमाचे समाजकल्याण कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. ७ रोजी सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. ८ एप्रिल रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल. ९ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृतीसंदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल. १० रोजी समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्यात येईल. ११ रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. १२ एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. १३ एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधीनस्थ सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे आदी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करणे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली जाईल. १५ प्रत्येक सहायक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून डॉ. आंबेडकरांनी महिलांविषयी केलेल्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...